Tag: चळवळीतील उपेक्षित

“चळवळीतील उपेक्षित बाप माणूस – बसवंतराव मुंडकर”

“चळवळीतील उपेक्षित बाप माणूस – बसवंतराव मुंडकर”

लेख
“चळवळीतील उपेक्षित बाप माणूस – बसवंतराव मुंडकर”हे पुस्तक वाचनात आले, आणि मी बिलोलीच्या आठवणीत कितीतरी वेळ हरवून गेले. हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचे चरित्र नाही, तर एका काळाचा, एका विचाराचा आणि एका निःस्वार्थ जीवनतत्त्वज्ञानाचा साक्षीदार आहे. कै. बसवंतराव मुंडकर यांचे व्यक्तिमत्त्व वाचताना आपण एखाद्या साध्या माणसात दडलेला असामान्य तेज अनुभवतो. कै. बसवंतराव मुंडकर हे नाव मोठ्या पदांमुळे किंवा प्रसिद्धीमुळे गाजलेले नाही; उलट त्यांच्या कार्याची खरी उंची त्यांच्या साधेपणात, प्रामाणिकपणात आणि निःस्वार्थ वृत्तीत दिसून येते. त्यांनी कधीही स्वतःच्या कार्याचा गाजावाजा केला नाही, पण समाजासाठी जगण्याची त्यांची वृत्ती प्रत्येक पानातून ठळकपणे जाणवते. म्हणूनच ते “किंग” नव्हे, तर “किंग मेकर” होते—इतरांना घडवणारे, प्रेरणा देणारे. शालेय जीवनापासूनच त्यांच्यातील नेतृत्वगुण स्पष्ट दिसतात. गोवा मुक्ती संग्राम...
error: Content is protected !!