ग्रामीण भागातील संस्कृती दोसलवार यांची एमबीबीएससाठी निवड
शहापूर तालुक्यातील वनाळी गावच्या विद्यार्थिनीची हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी निवड; माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार यांच्या हस्ते सत्कार
देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील वनाळी येथील संस्कृती गंगाधर दोसलवार हिची हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि ध्येयवादी प्रयत्नांच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संस्कृतीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल देगलूर येथील माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी संस्कृतीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना शैलेश उल्लेवार म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर निश्चित ध्ये...
