Tag: गुन्हेगारी

गुन्हेगारीवर लगाम घाला; कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश – पालकमंत्री अतुल सावे

गुन्हेगारीवर लगाम घाला; कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश – पालकमंत्री अतुल सावे

क्राइम
पालकमंत्री अतुल सावे यांनी कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने घेतला आढावा नांदेड| जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस विभागासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आज पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.   पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यात अलीकडे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक दक्षता घ्यावी, तसेच शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अचानक धाडी टाकून गुन्हेगारीला आळा घालावा, कोम्बींग ऑपरेशन राबवून आरोपी शोधासाठी विश...
हिमायतनगरमध्ये गुन्हेगारी वाढ; CCTV बसवण्याची मागणी, ‘मुस्लिम युवा टायगर सेना’ आक्रमक

हिमायतनगरमध्ये गुन्हेगारी वाढ; CCTV बसवण्याची मागणी, ‘मुस्लिम युवा टायगर सेना’ आक्रमक

क्राइम
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्य चौका-चौकांमध्ये तात्काळ CCTV कॅमेरे बसवावेत, अशी ठाम मागणी ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेना तर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. या संदर्भात मराठवाडा प्रदेश अध्यक्ष शेख खय्युम भाई खुरेशी आणि जिल्हाध्यक्ष शेख मुजम्मिल यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री ताडेवाड, नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब तसेच पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शहरात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. CCTV कॅमेरे बसविल्यास पोलिसांना तपासासाठी ठोस तांत्रिक पुरावे मिळतील. त्यामुळे खऱ्या गुन्हेगारांची ओळख पटेल आणि निर्दोष नागरिकांवर अन्याय होणार नाही.” मुख्यत्वे उमर चौक, आंबेडकर चौक...
वाढत्या गुन्हेगारीवर जबाबदारी निश्चित करा; 72 तासांत 5 हत्यांवर खा. अशोकराव चव्हाण यांची तीव्र प्रतिक्रिया

वाढत्या गुन्हेगारीवर जबाबदारी निश्चित करा; 72 तासांत 5 हत्यांवर खा. अशोकराव चव्हाण यांची तीव्र प्रतिक्रिया

राजकारण
नांदेड | नांदेड शहरात गेल्या 72 तासांत सलग पाच हत्यांच्या घटनांनी खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत वाढत्या गुन्हेगारीसाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, शहरात अल्पावधीत इतक्या गंभीर घटना घडणे अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी, अगदी शासकीय रुग्णालय परिसरातही हत्यांसारख्या घटना घडत असतील, तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सदर प्रकरणातील सर्व हत्याकांडांची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्य...
error: Content is protected !!