शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणार : गुणवंत पाटील हंगरगेकर
जन्मदिनानिमित्त विशेष अंकाचे विमोचन; शेतकरी, बाजारव्यवस्था आणि सामाजिक वास्तवावर परखड भाष्य
नांदेड, प्रतिनिधी| “शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी माझ्या कुवतीप्रमाणे आणि क्षमतेनुसार झिजता आले, याचे समाधान आहे. अन्नदात्या पोशिंद्याचे जीवन अधिक समृद्ध, सन्मानपूर्ण आणि स्वाभिमानी व्हावे, यासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत झटण्याचा माझा संकल्प आहे,” असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले.
त्यांच्या जन्मदिनानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात एका दैनिकाच्या विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी रामेश्वर बद्दर, डॉ. पाटील, गोविंद मुंडकर आणि बालाजी वैजळे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी बोलताना हंगरगेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले. शेतकरी हा केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेचा घटक नसून संपूर्ण समाजव्यवस्थेचा पोशिंदा आ...
