Tag: गावातील महिलांचे साकडे

पावसासाठी वाघी गावातील महिलांचे साकडे; पैनगंगा नदीचे पाणी आणून मारुतीराय व गणरायाचा जलाभिषेक

पावसासाठी वाघी गावातील महिलांचे साकडे; पैनगंगा नदीचे पाणी आणून मारुतीराय व गणरायाचा जलाभिषेक

शेती
दहा-बारा दिवसांपासून पाऊस गायब; सुकणाऱ्या पिकांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावातील महिलांनी पावसासाठी अनोखी प्रार्थना सुरु केली आहे. महिलांनी पैंनगंगा नदीतून पायी चालत जाऊन पाणी आणून गावातील मारुतीराय आणि श्री गणपती बाप्पाचा जलाभिषेक करत वरुणराजाने कृपा करावी आणि यंदाचा खरीप हंगाम सुगीचा व्हावा, असे साकडे घातले आहे. यंदा हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी हळद लागवडीवर मोठा भर दिला असून, त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे पेरण्या पूर्ण झाल्या; मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सलग दहा-बारा दिवस पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके सुकू लागली असून, ...
error: Content is protected !!