Tag: गावठी पिस्टल

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बेड्या; गावठी पिस्टलसह 1.32 लाखांचा मुद्देमाल जप्त

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बेड्या; गावठी पिस्टलसह 1.32 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, खंजरसह 1 लाख 32 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत 27 एप्रिलच्या रात्रीपासून 28 एप्रिलच्या पहाटेपर्यंत शहरात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. याचदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, काही संशयित इसम कामठा बाजार ते गाडेगाव रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाखाली थांबले असून ते दरोड्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तत्काळ छापा टाकून योगेश ऊर्फ गोट्या सोनकांबळे, राहुल काळे, राम कांबळे, श्रावण जोंधळे आणि मनोज कदम या पाच जणांना ...
नायगाव येथे अवैध शस्त्र प्रकरण उघड; दोन जण ताब्यात, गावठी पिस्टल जप्त

नायगाव येथे अवैध शस्त्र प्रकरण उघड; दोन जण ताब्यात, गावठी पिस्टल जप्त

क्राइम
नांदेड | नायगाव परिसरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ३० हजार रुपये आहे. ही कारवाई दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी नायगाव जवळील कंडाळा फाटा परिसरात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही इसम अवैधरित्या गावठी पिस्टल विक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून १) प्रल्हाद उर्फ सोनू पंढरी गायकवाड (रा. टाकळी तम्मा, ता. नायगाव) २) रवि धोंडिबा देवकांबळे (वय २१, रा. महात्मा फुले कॉलनी, नायगाव) याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या अंगझडतीत एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ७/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस का...
error: Content is protected !!