Tag: गाड्यांचा ६ जुलैला शुभारंभ

नांदेडहून मुंबई व उत्तराखंडला थेट रेल्वे! दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांचा ६ जुलैला शुभारंभ

नांदेडहून मुंबई व उत्तराखंडला थेट रेल्वे! दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांचा ६ जुलैला शुभारंभ

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड | नांदेडच्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी असून, ६ जुलै २०२६ रोजी नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ होणार आहे. या गाड्यांमुळे नांदेडचा राज्याची राजधानी मुंबई तसेच देवभूमी उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित होणार असून प्रवासी, भाविक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या दोन्ही गाड्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह, जितिन प्रसाद आणि अजय टम्टा हेही ऑनलाइन सहभागी होणार आहेत. हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर होणाऱ्या स्थानिक कार्यक्रमाला मंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोप...
error: Content is protected !!