Tag: खो-खो

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विजयी

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विजयी

क्रीडा
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे आयोजित पश्चिम विभागीय खो-खो (मुले) स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. पाच दिवस रंगलेल्या या स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ने द्वितीय, यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ने तृतीय, तर मुंबई विद्यापीठ ने चतुर्थ क्रमांक मिळविला. या स्पर्धेत एकूण ५८ संघांनी सहभाग नोंदविला. समारोप सोहळा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, बाबा कुलदीपसिंग महाराज, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन चे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, विभागीय सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले, एआययूचे निरीक्षक डॉ. जगदीश गस्थी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नारायण चौधरी, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता...
error: Content is protected !!