Tag: खासदार नागेश पाटील आष्टीकर

रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर

रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड/हिंगोली| मराठवाड्यातील तिरुपती बालाजी भक्तांसाठी थेट आणि सोयीस्कर रेल्वे सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील भाविकांना तिरुपतीला जाण्यासाठी थेट रेल्वे पर्याय अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे प्रवास करताना अनेकदा बदल करावे लागतात, ज्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढतात. विशेषतः वयोवृद्ध आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्या भक्तांसाठी ही बाब अधिक त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी हजारो भाविक तिरुपतीला दर्शनासाठी जात असल्याने, या भागातून थेट रेल्वे सेवा सुरू होणे ही दीर्घकालीन गरज बनली आहे. रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार झाल्यास प्रवाशांना अधिक सु...
BSNL नेटवर्कसाठी दिल्लीत पाठपुरावा; ग्रामीण भागाला दिलासा मिळणार?

BSNL नेटवर्कसाठी दिल्लीत पाठपुरावा; ग्रामीण भागाला दिलासा मिळणार?

राजकारण
नांदेड/हिंगोली, अनिल मादसवार| हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या दूरसंचार सेवांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया (Jyotiraditya Scindia) यांची भेट घेतली. या चर्चेत ग्रामीण भागातील BSNL नेटवर्कची अत्यंत दयनीय अवस्था मांडत, तात्काळ सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः नवीन मोबाईल टॉवर्स उभारणी, सिग्नलची गुणवत्ता वाढवणे आणि ग्राहकसंख्या वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. सध्या अनेक गावांमध्ये कॉल ड्रॉप, इंटरनेट बंद पडणे आणि सिग्नल नसणे अशा समस्या कायम आहेत. यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीनंतर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची ...
error: Content is protected !!