हिमायतनगर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी; खरीप पिकांना जीवदान
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर शहर व तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा जोर गुरुवारी सकाळपासून वाढल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी काही दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या खरीप पिकांना या मुरवणी पावसामुळे नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात अधूनमधून सुरू असलेल्या मौसमी पावसामुळे खरीप पिकांची स्थिती सुधारत आहे. यंदा पिके चांगली उभी असली तरी अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेला पाऊस पिकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरत असल्याचे कृषी जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, सततच्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तरीही अद्याप तालुक्यात ...
