खरीपासाठी नांदेड जिल्ह्यात मुबलक खतसाठा उपलब्ध
अफवांवर विश्वास ठेवू नका; गरजेनुसारच खत खरेदी करा – कृषी विभागाचे आवाहन
नांदेड| खरीप हंगाम 2026 साठी नांदेड जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खत टंचाईच्या भीतीपोटी अनावश्यक खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार, जमीन आरोग्य पत्रिकेच्या अहवालानुसार तसेच पिकांच्या वाढीच्या टप्प्यानुसार खतांचा वापर करावा, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
खत उपलब्धतेबाबत अफवा पसरवल्या जात असल्यास, जादा दराने विक्री, खतासोबत अन्य वस्तूंची सक्ती (लिंकिंग) किंवा बोगस खतांची विक्री आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खरीप हंगामात खत ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची कृषी निविष्ठा मानली जाते. राज्यस्तरावर कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून खत नियोजन केले जाते. नांदेड जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2026 मध्ये सुमारे 2 ...
