QR स्कॅनद्वारे खत उपलब्धतेची माहिती; शेतकऱ्यांना घरबसल्या सुविधा
योग्य दरात खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आवाहन
हिमायतनगर, अनिल मादसवार | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खत उपलब्धतेबाबत अडचणी येऊ नयेत यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना आपल्या नांदेड जिल्ह्यात, तालुक्यात तसेच हिमायतनगर शहरातील कोणत्या दुकानदाराकडे किती खत उपलब्ध आहे याची माहिती QR स्कॅनद्वारे घरबसल्या मिळणार आहे.
या सुविधेमुळे शेतकऱ्यांना खतासाठी विविध दुकानांवर वारंवार फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित दुकानात कोणत्या प्रकारचे खत उपलब्ध आहे, किती स्टॉक शिल्लक आहे तसेच दुकानदाराची माहितीही पाहता येणार आहे.
शेतकरी बांधवांनी सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे देऊ नयेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. विशेषतः ...
