कौठा येथे नृसिंह जन्मोत्सव उत्साहात; भव्य मिरवणूक, महाआरतीने भक्तिमय वातावरण
नवीन नांदेड | बसवेश्वर नगर, जुना कौठा येथील श्री नृसिंह नरोबा मंदिरात नृसिंह जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ३० एप्रिल रोजी पुजारी गुरू व्यंकटेश मुळी यांच्या हस्ते विधीवत पूजा, अभिषेक, पारायण व कीर्तन कार्यक्रम पार पडले. सायंकाळी भव्य मिरवणूक आणि महाआरतीने वातावरण भक्तिमय झाले.
या प्रसंगी टाळ-मृदंगाच्या गजरात व जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. मंदिर परिसरातून रविनगर मार्गे मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या मिरवणुकीचे विविध ठिकाणी भाविकांनी पूजन करून स्वागत केले. जन्मोत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीने सोहळ्याची रंगत अधिकच वाढली.
अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त २२ ते ३० एप्रिल दरम्यान श्रीराम कथा, काकडा, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ आणि कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हभप स...
