जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : हदगाव मतदारसंघातून कृष्णा पाटील आष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
समर्थकांच्या जोरदार शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल; सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
नांदेड | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी हदगाव मतदारसंघातून कृष्णा पाटील आष्टीकर यांनी मंगळवारी (दि. ३० जून) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी विलासराव व्यवहारे, बंडू पाटील मिराशे (तालंग), पंजाबराव तांबारे (गारगव्हाण), अशोकराव कदम (मार्लेगाव), गजानन कदम (रुई), सुभाषराव एकलारे (सावरगाव), अवधूत देवसरकर (लिंगापूर), संतोष विनायकराव कदम (बोरगाव), अविनाश शिंदे (कोथळा), सुनील आनेराव (करमोडी), सिताराम किसनराव भुरके (चोरंबा), डिंगाबर धुमाळे (खरबी), तुकाराम नाईक (माळझरा), रमेश घंटलवार (घोगरी), बालाजीराव कदम (वाळकी), संतोष कोल्हे (धानोरा), सतीश रामराव माने (येळंब), श्रीराम ...
