बिलोली तालुक्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; शेतकऱ्यांसमोर अडचणींची शक्यता
नांदेड/बिलोली (गोविंद मुंडकर) बिलोली तालुका सीड्स, फर्टिलायझर्स व पेस्टिसाईड असोसिएशनच्या वतीने दिनांक २७ एप्रिल २०२६ पासून तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विक्रेत्यांच्या बेमुदत बंद आंदोलनाला पाठिंबा देत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनकडून देण्यात आली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष सत्यजीत तुपेवार, उपाध्यक्ष भागवत लोकमनवार, आदित्य बेजगमवार आणि सचिव साईनाथ मंडगे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागांना निवेदनही देण्यात आले आहे.
या बंदच्या मागे अनेक महत्त्वाचे मुद्दे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनधिकृत एचटी बीटी बियाण्यांची विक्री रोखण्याची मागणी, खत कंपन्यांकडून केली जाणारी लिंकिंग पद्धती बंद करण्याची गरज, तसेच अवैध कीटकनाशके व ...
