‘कूल रूफिंग’चा प्रभावी परिणाम; नांदेडमध्ये तापमानात ७-८ अंशांची घट, १०० कुटुंबांना दिलासा
नांदेड| शहरातील गरजू वस्त्यांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘कूल रूफिंग’ उपक्रमामुळे घरांच्या आतील तापमानात तब्बल ७ ते ८ अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले आहे. या उपक्रमामुळे सुमारे १०० कुटुंबे व लघु व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हा अभिनव प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ, Practical Action (PAC) आणि AIDMI यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निसर्ग आधारित उपाय’ (Nature-Based Solutions) अंतर्गत राबविण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत लहान व कमी उंचीच्या घरांच्या छतांवर ‘कूल रूफिंग’ तंत्रज्ञान वापरून उष्णता परावर्तित केली जाते, ज्यामुळे घरातील तापमान लक्षणीयरीत्या कमी होते. कडक उन्हाळ्यात घरांसह छोट्या व्यावसायिक जागांमधील उकाडा कमी झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य झाले आहे.
या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विष्णुनगर परिसरातील लाभार्थ्यांच्या घरी भे...
