Tag: कुस्ती स्पर्धा

“परंपरेचा अभिमान, नव्या युगाची शान – बिलोलीची कुस्ती पुन्हा सज्ज!”

“परंपरेचा अभिमान, नव्या युगाची शान – बिलोलीची कुस्ती पुन्हा सज्ज!”

क्रीडा
बिलोली, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहराची कुस्ती परंपरा ही केवळ क्रीडा नसून संस्कृतीचा जाज्वल्य वारसा मानली जाते. तब्बल शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या भूमीने अनेक नामांकित पैलवान घडवले असून, कुस्तीच्या माध्यमातून बिलोलीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागील वर्षी १३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या जंगी कुस्त्यांनी इतिहास रचला होता. नगराध्यक्ष संतोषदादा कुलकर्णी यांच्या ५१ हजार रुपयांच्या इनामी कुस्तीपासून ते बी.पी. नरोड दादा (३१ हजार) आणि अभिजीत तुडमे (२१ हजार) यांच्या लढतींनी प्रेक्षकांची मने जिंकली. जिल्हा क्रीडा अधिकारी शंकर भास्करे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जिल्ह्यांतील पैलवान सहभागी झाल्याने स्पर्धेचा दर्जा उंचावला होता. पूर्वीच्या काळात कुस्तीनंतर नाच-गाण्याची परंपरा होती. कालांतराने ती लोप पावली होती; मात्र नगरसेवक प्रतिनिधी गंगाधर पप्पुलवार यांच्या ...
रामनवमी–आमली बारशी निमित्त सरसम (बु.) येथे जंगी कुस्त्यांचा थरार

रामनवमी–आमली बारशी निमित्त सरसम (बु.) येथे जंगी कुस्त्यांचा थरार

क्रीडा
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| रामनवमी व आमली बारशीच्या पावन पर्वावर सरसम (बु.) ता. हिमायतनगर येथे बसवेश्वर देवस्थानाच्या वतीने आयोजित जंगी कुस्त्या स्पर्धा आणि भंडारा कार्यक्रम यंदाही उत्साहात पार पडला. परंपरा, क्रीडा आणि भक्तीचा संगम घडवणाऱ्या या सोहळ्याने परिसरात विशेष रंगत आणली. दि. ३० मार्च २०२६ रोजी झालेल्या या कुस्ती फडात नामांकित पहलवानांनी दमदार झुंजी देत उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक झुंजीला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मैदानावर टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात वातावरण भारावून गेले होते. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसांनी गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी ₹९९९९, द्वितीय ₹७७७७, तृतीय ₹४४४४ आणि चतुर्थ क्रमांकासाठी ₹३३३३ अशी पारितोषिके देण्यात आली. याचबरोबर भाविकांसाठी भव्य महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला होता. हजारो भाविकांनी प्रसादाच...
error: Content is protected !!