Tag: कुस्ती मैदानाचे उद्घाटन

बोंढार हवेली येथे भव्य कुस्ती मैदानाचे उद्घाटन; नामांकित पैलवानांची दमदार हजेरी

बोंढार हवेली येथे भव्य कुस्ती मैदानाचे उद्घाटन; नामांकित पैलवानांची दमदार हजेरी

क्रीडा
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील बोंढार हवेली (जुने गाव) येथे श्री महारूद्र कलशारोहणाच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भव्य कुस्ती दंगल मोठ्या उत्साहात पार पडली. दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक नामांकित पैलवानांनी सहभाग नोंदवला. गुरू समगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी 3 वाजता कुस्ती दंगल रंगली. या स्पर्धेत प्रथम बक्षीस 31 हजार रुपये, द्वितीय 21 हजार रुपये आणि तृतीय 11 हजार रुपये ठेवण्यात आले होते. एकूण सुमारे सात लाख रुपयांची बक्षिसांची जंगी उधळण करण्यात आली. या कुस्ती दंगलीचे उद्घाटन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुरुवर्य समगीर महाराज यांच्यासह राज्यभरातील नामांकित पैलवानांची उपस्थि...
error: Content is protected !!