नांदेड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरे
महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन; तलाठी, ग्रामसेवक व मंडळ अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाकडून नोंदी व कागदपत्रांची पडताळणी
नांदेड| जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, तिच्या अंमलबजावणीत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
या शिबिरांसाठी प्रत्येक महसूल मंडळात तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांचे संयुक्त पथक कार्यरत राहणार आहे. जुन्या कुणबी नोंदी शोधणे, नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी करणे, नवीन अर्ज स्वीकारणे तसेच आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून परिपूर...
