धावत्या कारने घेतला पेट कार जळून खाक !
नांदेड - बीदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर दिग्रस खुर्द जवळील घटना
कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द गावाजवळ एका हुंडाई कंपनीच्या चालत्या कार ला अचानक आग लागल्याने संपूर्ण कार जळून खाक झाल्याची घटना १३ एप्रिल रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली.या घडलेल्या भयंकर घटनेतून कार चालक सुदैवाने बालबाल बचावला आहे.
या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की, कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील गजानन भोसले वय २८ वर्ष हे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे येथे स्थायिक झाले आहेत. ते १३ एप्रिल रोजी काही घरगुती कामानिमित्त पुणे येथून लातूर मार्गे आपली हुंडाई सेंट कार क्रमांक एमएच १२ आरएन ७१२३ ने अंबुलग्याकडे जात असताना नांदेड - बिदर राष्ट्रीय महामार्ग ५० वरील दिग्रस खुर्द गावाजवळील गांधीनगर पाठीजवळ आले.
अचानक कारच्या समोर हरीण आल्यामुळे भोसले यांनी गाडीचे ब्रेक दाबले असता कारने अचानक पेट ...
