कारला पिचोंडीतील २६३ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत मंजुरी
ग्रामसभेत मंजूर यादीचे वाचन; ग्रामपंचायत अधिकारी नारायण काळे यांचा सत्कार
हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर तालुक्यातील कारला पिचोंडी येथे अनेक वर्षांपासून घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंचायत समितीमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या २६३ लाभार्थ्यांच्या यादीचे ग्रामसभेत वाचन करण्यात आले.
गावातील पात्र वंचित लाभार्थ्यांचे ग्रामपंचायत अधिकारी नारायण काळे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानंतर पंचायत समितीकडून २६३ लाभार्थ्यांची मंजूर यादी ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाली. ग्रामसभेत ही यादी ग्रामस्थांना वाचून दाखवून घरकुल योजनेबाबत आवश्यक माहिती देण्यात आली.
यावेळी प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, मोदी आवास योजना, मनरेगा तसेच गावातील मूलभूत सुविधा आणि विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. ...
