कामारीतील कै. सुभाष शिरफुले यांच्या कुटुंबीयांना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची १ लाखांची मदत
मुलांच्या शिक्षणाची चिंता नको; दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत दिला आधार
हिमायतनगर | उत्कर्ष मादसवार : दुष्काळाचे संकट, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने आधीच अडचणीत सापडलेल्या कामारी येथील शिरफुले कुटुंबाला हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी मदतीचा हात दिला. गुरुवारी त्यांनी कै. सुभाष केशवराव शिरफुले यांच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि मुलांच्या शिक्षणासाठी तब्बल १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली.
कै. सुभाष शिरफुले यांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे. त्यातच सततची दुष्काळी परिस्थिती आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा कुटुंबासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कदम कोहळीकर यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी कुटुंबीय...
