कामगारांच्या लेकरांच्या शिक्षणालाच ‘ब्रेक’; वर्षभरापासून शिष्यवृत्ती रखडली!
बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; नूतनीकरणाच्या फेऱ्यात हजारो कामगार योजनांपासून वंचित
देगलूर, गंगाधर मठवाले | बांधकाम कामगारांच्या कष्टाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्या पाल्यांना देण्यातच प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती गेल्या वर्षभरापासून रखडल्याने कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पात्र विद्यार्थ्यांची प्रकरणे कार्यालयीन प्रक्रियेत अडकून पडली असताना शैक्षणिक वर्ष पुढे सरकत आहे.
कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे, आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने महामंडळाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत मिळत नसल्याने योजनेचा...
