एचटीबीटी कपाशी बियाण्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश
नांदेड| जिल्ह्यात एचटीबीटी कपाशी बियाण्यांची साठवणूक, वाहतूक व विक्री यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले आहेत. अशा प्रकरणांमध्ये तातडीने कायदेशीर कारवाई करून पोलीसांकडून गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कापूस लागवडीची तयारी करत असताना बाजारात अनधिकृत व बंदी असलेल्या एचटीबीटी बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी महसूल, कृषी व पोलीस विभागाच्या समन्वयातून जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी किडरोग सल्ला प्रकल्पाचे पुनर्रचना, दक्षता पथकाची स्थापना, तसेच कपाशी पिकातील तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना लहान यंत्रे उपलब्ध करून देणे व त्याचा प्रसार करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय, क्षेत्रीय स्तरावर पथकांमार्फत तपासणी मोहीम राबविण्याचेही आद...
