Tag: ओबीसीं

ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर शासनाचा भर : अतुल सावे

ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर शासनाचा भर : अतुल सावे

महाराष्ट्र
नांदेड| इतर मागास वर्ग (ओबीसी) आणि बहुजन समाजाच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून, ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर विशेष भर दिला जात असल्याचे प्रतिपादन इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांनी केले. नांदेड येथील विष्णूनगर परिसरातील शंकरराव चव्हाण सभागृहात इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्यात’ ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार बाबुराव कोहळीकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री सावे म्हणाले की, तळागाळातील घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. महामंडळांच्या माध्यमातून सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे आणि स्वयंरोजगाराच्या सं...
error: Content is protected !!