हदगाव येथे दिव्यांगांसाठी ‘ऑन दि स्पॉट’ शिबिर; कृत्रिम अवयव व साहित्याचे तात्काळ वितरण
हदगाव | नांदेड जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स तसेच आवश्यक दिव्यांग साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी हदगाव येथील श्री साईबाबा निवासी दिव्यांग विद्यालयात ‘ऑन दि स्पॉट’ शिबिर उत्साहात पार पडले.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, नांदेड, एस.आर. ट्रस्ट (मध्य प्रदेश) आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून कृत्रिम अवयवांचे मोजमाप घेण्यात आले. अनेक लाभार्थ्यांना आवश्यक दिव्यांग साहित्याचे तात्काळ वितरणही करण्यात आले.
शिबिराला जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, गटविकास अधिकारी डी. के. आडेराघोव, दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल, विस्तार अधिकारी बालासाहेब पवार, व्ही. एम. मुंडकर, सतीश फुलारी आणि शाखा अभियंता एस. एस. नालंदे या...
