ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा; विसरलेली ओरिजनल डिग्रीची कागदपत्रे विद्यार्थ्याला केली परत
नांदेड | आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जीवनात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना नांदेडमधील एका ऑटो रिक्षा चालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे समाजासमोर आदर्श निर्माण झाला आहे. प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली अति महत्त्वाची ओरिजनल डिग्रीची कागदपत्रे संबंधित विद्यार्थ्याला सुखरूप परत करून रिक्षा चालकाने माणुसकीचे दर्शन घडविले.
ही घटना १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन 2026 रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या दरम्यान घडली. टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे सदस्य तथा रिक्षाचालक मिलिंद जोंधळे (रा. खोब्रागडे नगर, नवा मोंढा, नांदेड) हे नेहमीप्रमाणे प्रवासी वाहतूक करत होते.
दरम्यान, अमोल अंतकुरे (रा. शिरसी, पो. पेठवडज, ता. कंधार, जि. नांदेड) हे विद्यार्थी नमस्कार चौक ते रेल्वे स्टेशन असा प्रवास करून MH 26 BD 2796 या रिक्षातून घाईगडबडीत उतरले. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले...
