Tag: एसबीआय नांदेड

एसबीआय नांदेडमध्ये महामानवांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

एसबीआय नांदेडमध्ये महामानवांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र
नांदेड | भारतीय स्टेट बँक (एसबीआय) प्रशासकीय कार्यालय नांदेड तसेच एसबीआय अधिकारी, सेवा, कर्मचारी व ओबीसी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम शिवाजीनगर येथील औद्योगिक शाखेत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक महाप्रबंधक मयंक चतुर्वेदी होते. प्रमुख वक्ते म्हणून यशवंत महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अजय गव्हाणे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य प्रबंधक अनुप फाटे (मानव संसाधन), संघटनांचे पदाधिकारी सदाशिव चाळणेवाड, शिल्पा जिंतूरकर, उमेश आडगावकर, किरण कुमार जिंतूरकर, कपिल ढवळे, अतुल पखाण, राहुल खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रस्तावना शिल्...
error: Content is protected !!