नांदेड : घरफोडी करणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; 3.90 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश मिळाले आहे. घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख 90 हजार 332 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दाखल गुन्हा क्रमांक 1195/2025, कलम 331(4), 305 भारतीय न्याय संहितेनुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शेख जुबेर ऊर्फ जेडी शेख खदीर (वय 23, रा. वाजेगाव, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड) यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी पथकासह ही मोहीम राबवली....
