५०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय ‘एडीबी’च्या अर्थसाहाय्याने उभारण्यास मंजुरी
राज्य सरकारचा मोठा निर्णय; खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड| राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'प्रगती' प्रकल्पाअंतर्गत नांदेड येथे आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अर्थसाहाय्यातून ५०० खाटांचे नवीन जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी मागील दोन वर्षांपासून या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, नागरिकांना स्थानिक पातळीवर दर्जेदार व मोफत उपचार उपलब्ध करून देणे, हा या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीचा मुख्य उद्देश आहे. या रुग्णालयाच्या प्रभावी संचालनासाठी मंजूर आकृतीबंधानुसार सर्व ५९४ पदे नव्याने निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली असून, या नवनिर्मित पदांच्या वेतनासाठी ३१.२५ कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च मंजूर करण्यात ...
