एकघरी बंधारा दुरुस्तीतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करा; अन्यथा १५ जुलैपासून उपोषणाचा इशारा
जलसंधारण अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; प्राजक्ता गुंडेकर यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे एकघरी येथील बंधारा दुरुस्तीच्या कामात कथित आर्थिक गैरव्यवहार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत संबंधित जलसंधारण अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी युवती सेना जिल्हा समन्वयक तथा ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता रामराव गुंडेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, एकघरी येथील बंधारा दुरुस्तीसाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात बंधाऱ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी केवळ मतिमिश्रित पद्धतीने नियमांना बगल देऊन वरवरची कामे करून बंध...
