पोटा आबादीजवळ उभ्या ट्रकला दुचाकीची धडक
आजोबा-नातवाचा जागीच मृत्यू, एक गंभीर
हिमायतनगर | भोकर-हिमायतनगर महामार्गावरील पोटा आबादी परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात आजोबा व नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात आणखी एक सहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी बालाजी गंगाराम नाचारे (वय 50), त्यांचा नातू आरूष रतन नाचारे आणि अक्षय माधव शेळके (वय 6) हे तिघेजण दुचाकीवरून प्रवास करत होते. दरम्यान, पोटा आबादीजवळील मनीषा आश्रम शाळेसमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली.
या भीषण अपघातात बालाजी नाचारे व त्यांचा नातू आरूष नाचारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अक...
