जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांविरोधातील उपोषणाचा दुसरा दिवस; प्रशासनाची उदासीनता चर्चेत
नांदेड| जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी व मुलांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने दुसऱ्या दिवसाअखेरही दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पत्नी दैवशाला जगदीश बारदेवाड यांनी आपल्या चिमुकल्यांसह 6 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पतीकडून मानसिक छळ, पालनपोषणाचा अभाव आणि गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहण्याचा आरोप त्यांनी केला आहे.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत: मुलांच्या पालनपोषण व शिक्षणाचा खर्च करावा, जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे द्यावीत, सेवापुस्तिकेत पत्नी व मुलांची नोंद करावी, कुटुंबासोबत राहून जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, घराचे थकीत हप्ते भरावेत आदी मागण्याचा समवेश आहे.
दरम्यान, उपोषणाचा दुसरा दिवस उलटूनही प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याचा आरोप करण्यात य...

