उन्हाळी गर्दीवर तोडगा; काकीनाडा–हिसार विशेष ‘TOD’ गाडीची घोषणा
नांदेड| उन्हाळ्याच्या हंगामात वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून दक्षिण मध्य रेल्वेने काकीनाडा टाउन–हिसार दरम्यान “Train on Demand (TOD)” विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. ही गाडी मुदखेड–नांदेड–पूर्णा–बसमत–हिंगोली–वाशीम–अकोला मार्गे धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक 07717 काकीनाडा टाउन–हिसार TOD विशेष गाडी 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 05.40 वाजता काकीनाडा टाउन येथून सुटेल. ही गाडी मुदखेड (22.15), नांदेड (23.10), पूर्णा (00.40), बसमत (01.10), हिंगोली (02.35), वाशिम (03.55), अकोला (05.45) मार्गे पुढे भुसावळ, वडोदरा, रतलाम व चित्तौडगड या प्रमुख स्थानकांवर थांबत गुरुवारी दुपारी 13.40 वाजता हिसार येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07718 हिसार–काकीनाडा टाउन TOD विशेष गाडी 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 14.10 वाजता हिसार येथून सुटून रविवारी 12.35 वाजता काक...
