दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
पुणे| महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धन विभागाचा महत्त्वपूर्ण वाटा असून राज्याच्या एकूण उत्पन्नात या क्षेत्राचा सुमारे २.८ टक्के, तर कृषी उत्पन्नात तब्बल २५.१ टक्के वाटा आहे. वाढती लोकसंख्या, वाढणारी श्रमशक्ती आणि दुधाची वाढती मागणी लक्षात घेता ग्रामीण युवकांसाठी दुग्धव्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरत आहे.
दुग्ध उत्पादनात वाढीची मोठी संधी - सध्या महाराष्ट्र दुग्ध उत्पादनात देशात पाचव्या क्रमांकावर असून राज्याचे वार्षिक उत्पादन १६.६२ MMT आहे. मात्र, प्रति व्यक्ती आवश्यक ३५८ ग्रॅम दुधाच्या तुलनेत सध्या केवळ ३०० ग्रॅम उपलब्धता आहे. ही तूट भरून काढण्यासाठी दुग्धव्यवसायात मोठी संधी निर्माण झाली आहे.
उद्योजकतेकडे वाटचाल - पारंपारिक शेतीपूरक व्यवसाय म्हणून पाहिल्या जा...
