पालकमंत्र्यांकडून विविध योजनांचा आढावा; शेतकरी हित, आरोग्य सेवा व निधी वापरावर भर
नांदेड(प्रतिनिधी) जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेतला. यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, आयुष्यमान भारत कार्ड योजना, पाटबंधारे विभागाचे प्रकल्प तसेच जिल्हा नियोजन निधीच्या विनियोगाचा समावेश होता.
या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी हिताला प्राधान्य
बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. शासनाचे धोरण शेतकरी हिताला प्राधान्य देणारे असून त्यांच्य...
