आनंदी जीवनासाठी गुरुकृपेचे महत्व
प्रस्तावना - गुरू हे जीवनाला योग्य दिशा देणारे असतात. श्री दत्तगुरूंनी जसे २४ गुणगुरु केले, तसे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक प्रसंगातील गुण पाहण्याची दृष्टी गुरू देतात. परंतु आपण बहुधा स्वतःतील आणि इतरांतील गुणांकडे न पाहता स्वभावदोष व उणिवांकडेच लक्ष देतो. त्यामुळे जीवनातील आनंदाचे अनेक क्षण अनुभवण्यापासून वंचित राहतो. प्रत्यक्ष आनंदी जीवन जगण्यासाठी श्री दत्तगुरूंप्रमाणे प्रत्येकातील गुण पाहण्याची वृत्ती आवश्यक आहे. गुरुकृपायोगानुसार व्यक्तीतील स्वभावदोष आणि अहं कसे दूर होतात, तसेच आनंदमय जीवनाकडे वाटचाल कशी होते, यासंदर्भात माहिती सनातन संस्थेने संकलित केलेल्या या लेखातून पाहू.
गुरुकृपेचे महत्त्व - श्री गुरुचरित्र (१३:१३०) मध्ये म्हटले आहे, "गंगेमुळे पाप, शशीमुळे ताप आणि कल्पतरूमुळे दैन्य नाहीसे होते; परंतु श्रीगुरूंच्या दर्शनाने पाप, ताप आणि दैन्य या तिन्हींचे हरण होते." गुरु जीवाला ...
