आदिवासी योजनांच्या अंमलबजावणीचा समितीकडून आढावा
नांदेड | आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. योजनांच्या अंमलबजावणीत आढळणाऱ्या त्रुटी तातडीने दूर करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार दौलत दरोडा यांनी प्रशासनाला दिले.
महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने दि. १९ ते २१ ऑगस्टदरम्यान नांदेड जिल्ह्याचा दौरा करून आदिवासीबहुल भागातील विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर नांदेड येथील नियोजन भवनात झालेल्या बैठकीत आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत जातपडताळणी, वनहक्क दावे, आदिवासींच्या जमिनी, शिक्षण, आश्रमशाळा, वसतिगृहे तसेच आरोग्य सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. आदिवासींसाठी राखीव असलेली पदे रिक्त राहू नयेत,...
