आई-वडील व गुरु न विसरणाऱ्या देगलूरकरांचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा — ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर
देगलूर| येथील बंडयाप्पा मठ संस्थान, गांधी चौक येथे गुरुवर्य पंडित बाबुरावजी उप्पलवार यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिष्यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमुळे हा सोहळा विशेष ठरला.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर म्हणाले की, आजच्या काळात अनेकजण आई-वडिलांविषयी कृतज्ञता विसरत आहेत. मात्र देगलूरकरांनी गुरु, आई-वडील यांच्याप्रती दाखवलेला आदर हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनुकरणीय आहे. “आई, वडील आणि गुरुजन यांना कधीही विसरू नये,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात गुरुवर्य पंडित बाबुरावजी उप्पलवार व सौ. सरस्वतीबाई उप्पलवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकशाहीर रमेश गिरी, दिगू तुमवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रमेश गिरी यांनी पंडितजींबाबतचे अनुभव सांगत त्यांच्या शताब्दी सोहळ्यालाही उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली. दिगू तुमवाड यांनी पंडित...
