आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठी गझलेचा सन्मान; मॉरिशसमधील साहित्य संमेलनात बापू दासरी अध्यक्ष
नांदेड | मॉरिशस येथे होणाऱ्या सातव्या अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलनातील गझल मुशायरा व कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेडचे ज्येष्ठ कवी व गझलकार बापू दासरी यांची निवड करण्यात आली आहे. आयोजकांनी नुकतीच ही घोषणा केली असून, त्यांच्या निवडीमुळे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चार दशकांपासून मराठी गझल चळवळीत सक्रिय असलेल्या बापू दासरी यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक काव्यमैफिली, शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम आणि गझल मुशायऱ्यांचे प्रभावी सूत्रसंचालन केले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेऊन त्यांची या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय साहित्यिक व्यासपीठावर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नांदेड येथे गेल्या अकरा वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात त्यांचा मोलाचा वाटा असून ते या समितीचे अध्यक्ष आहेत. त...
