लोकप्रतिनिधींच्या असहकारामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला -डॉ. कोम्पलवार
नांदेड, गोविंद मुंडकर| मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या मराठवाडा जनता विकास परिषदेला असलेल्या असहकारामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला, असा संताप म.ज. वि.प.चे जिल्हाध्यक्ष व बाभळी बंधाऱ्याचे योद्धे डॉ.बालाजी कोम्पलवार यांनी आनंदधाम, सीताखंडी, तालुका भोकर येथे संपन्न झालेल्या जिल्हा बैठकीत व्यक्त केला.
याप्रसंगी मराठवाड्याचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ रोडे, रेल्वे संघर्ष समितीचे शंतनू डोईफोडे, समाजसेवक डॉक्टर अशोक बेलखोडे, बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, उपप्राचार्य डॉक्टर खिल्लारे, सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर ,समाजसेवक भाऊराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विरोधी पक्षात असताना राजकीय मंडळी मराठवाडा जनता विकास परिषदेमध्ये सक्रिय असतात परंतु सत्तेत गेल्यावर मात्र म.ज.वि.प.च्...
