Tag: अवैध वाळू

नांदेडमध्ये अवैध वाळूविरुद्ध मोठी कारवाई; 87.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये अवैध वाळूविरुद्ध मोठी कारवाई; 87.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड | नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलीस विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल 87 लाख 20 हजार रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पथकाला नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कल्हाळ शिवारात पाठविण्यात आले होते. दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता छापा टाकण्यात आला असता, गोदावरी नदीपात्रातून इंजिन बोटींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईदरम्यान तीन इंजिन बोटी, एक फायबर बोट, वाळूने भरलेले 34 तराफे, भारत बेंझ कंपनीचा एक हायवा, एक JCB मशीन आणि सुमारे 640 ब्रास वाळू असा एकूण 87.20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण प...
गोदावरी पात्रात अवैध वाळू उपशावर पोलिस-महसूलचा संयुक्त ‘धडक’ छापा

गोदावरी पात्रात अवैध वाळू उपशावर पोलिस-महसूलचा संयुक्त ‘धडक’ छापा

क्राइम
नांदेड| नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलिस व महसूल विभागाने संयुक्तरित्या मोठी कारवाई करत तब्बल 90 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत ही कारवाई राबविण्यात आली. उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, नायगाव तालुक्यातील इज्जतगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता, नदीपात्रातून लोखंडी फावड्यांच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालात 60 लोखंडी फावडी बोट – अंदाजे किंमत ₹20 लाख 30 ...
error: Content is protected !!