ऑपरेशन क्रॅकडाऊन : अवैध जनावर वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; ११.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त
विमानतळ, इतवारा व मांडवी पोलिसांची संयुक्त कारवाई; ११ जनावरांची सुटका, सहा आरोपींवर गुन्हे
नांदेड | ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत नांदेड पोलिसांनी अवैध जनावर वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत ११ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विमानतळ, इतवारा व मांडवी पोलीस ठाण्यांच्या पथकांनी स्वतंत्र कारवायांमध्ये ११ गोवंश व महेस जातीच्या जनावरांची सुटका केली असून, या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अवैध जनावर वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याच्या आदेशानुसार संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे २४ मे रोजी छापे टाकले.
विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत आबना ओव्हरब्रिज रोड परिसरात कारवाई करत निजामाबाद (तेलंगणा) ये...
