‘अमरनाथ गुहेतून’ – भाग 14 (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
*अखेरच्या टप्प्यातील अविस्मरणीय प्रवास*
अमरनाथ यात्रेचा शेवट आता अगदी जवळ आला होता. दोन दिवसांनंतर प्रत्येकजण आपल्या घरी परतणार होता. मनात बाबा बर्फानींच्या दर्शनाचे समाधान होते, तर दुसरीकडे सहप्रवाशांचा सहवास संपणार याची हळवी जाणीवही होती.रात्रीच ठरल्याप्रमाणे पहाटे तीन वाजता सर्वांना वेकअप कॉल देण्यात आला. दिवसभराच्या धावपळीमुळे प्रत्येकाची झोप गाढ झाली होती, त्यामुळे कुणालाही उठवण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. सर्वांनी वेळेत तयारी केली आणि चार जणांनी मिळून एक ऑटो करत अमृतसर रेल्वे स्थानक गाठले. प्रत्येकी ऑटोचे २५० रुपये भाडे देऊन आम्ही वेळेआधीच स्टेशनवर पोहोचलो. सर्वांचे रेल्वे आरक्षण निश्चित असल्यामुळे कोणतीही धावपळ किंवा तणाव नव्हता.
पहाटे पावणे पाच वाजता शताब्दी एक्सप्रेसने आमचा दिल्लीकडे प्रवास सुरू झाला. लुधियाना येथे नेहमीप्रमाणे सरदार कुलदीपसिंघ आमच्या स्वागतासाठी ह...
