अमरनाथ गुहेतून – भाग ८ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
बाबांच्या सान्निध्यातून… आता श्रीनगरच्या कुशीत!
कालचा दिवस आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय ठरला होता. बाबा बर्फानींचे दर्शन, तब्बल २८ किलोमीटरचा खडतर प्रवास आणि हजारो भाविकांच्या “बम बम भोले”च्या जयघोषात आम्ही पुन्हा बालटाल बेस कॅम्पमध्ये परतलो होतो. शरीर थकले होते, पण मन मात्र अपार समाधानाने भरून गेले होते. आज श्रीनगरकडे परतीचा प्रवास होता. एका अर्थाने यात्रेचा धार्मिक टप्पा पूर्ण झाला होता आणि आता निसर्गसौंदर्याचा अध्याय सुरू होणार होता.
यात्रेच्या मार्गावर मी भारतीय जनता पक्षातर्फे अमरनाथ यात्रेकरूंचे स्वागत करणारे चार बॅनर लावले होते. त्या बॅनरवर भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, खासदार मा. अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, संजय कोडगे, ॲड. चैतन्य देशमुख, भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष व आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकाराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख तसेच माझे छायाचित्...
