‘अमरनाथ गुहेतून’ – भाग १५ लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर
प्रवास संपला… पण नात्यांचा प्रवास अधिक दृढ झाला!
तेरा दिवसांचा सहवास आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला होता. रेल्वे महाराष्ट्राच्या दिशेने धावत होती आणि प्रत्येक स्थानकासोबत प्रवासाची सांगता जवळ येत होती. मात्र या शेवटच्या दिवसातही प्रेम, आत्मीयता आणि सेवाभावाचा वर्षाव तितक्याच ओलाव्याने होत राहिला.
पहाट सरून सकाळ झाली आणि रेल्वे भोपाळ स्थानकावर थांबली. तेथे माझे जुने स्नेही, उद्योगपती प्रदीप शुक्ला यांच्या परिवाराने पुन्हा एकदा आपुलकीची परंपरा जपली. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिभा शुक्ला स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह भरगच्च नाश्त्याची व्यवस्था करून स्थानकावर उपस्थित होत्या. पदार्थांची चव, मांडणी आणि प्रेमाचा स्पर्श इतका सुंदर होता की क्षणभर एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील नाश्त्याचा अनुभव घेत असल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली.
प्रदीपजींशी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी रेल्वे...
