नांदेड हादरले! गँगवॉरमधून तिहेरी खून; रुग्णालयातही रक्तरंजित सूडनाट्य
नांदेड| शहरातील वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केलं असून, शुक्रवारी मध्यरात्री तिहेरी खूनाची थरारक घटना घडली आहे. दोन प्रतिस्पर्धी गटांतील वर्चस्वाच्या वादातून सुरू झालेल्या हिंसक संघर्षात प्रथम दोघांचा निर्घृण खून झाला, तर काही तासांतच रुग्णालयात घडलेल्या सूडाच्या हल्ल्यात तिसऱ्याचा जीव गेला. या सलग घटनांमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कॅनाल रोड परिसरातील ई-स्क्वेअर सिनेमागृहाजवळ रात्री उशिरा दोन गट आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी धारदार शस्त्रांचा वापर करत जोरदार हल्ला करण्यात आला. या भीषण झटापटीत दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. भररस्त्यात झालेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथेच सूडाची आणखी एक थ...

