Tag: अपघातप्रवण

सोनारी फाटा अपघातप्रवण; स्पीड ब्रेकरअभावी वाढते अपघातांचे प्रमाण

सोनारी फाटा अपघातप्रवण; स्पीड ब्रेकरअभावी वाढते अपघातांचे प्रमाण

महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड–आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा हा अपघातप्रवण ठिकाण ठरत असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे वारंवार अपघात होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या ठिकाणी हदगावकडे जाणारा रस्ता तसेच वाळकेवाडी गावाकडे आणि नांदेड–किनवट महामार्गाचा संगम असल्याने चौरस्ता असून, वाहतुकीची मोठी वर्दळ होत असते. मात्र, या ठिकाणी सर्वच बाजूला स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नसून अपघातांची मालिका सुरूच आहे. दि. ३१ मार्चच्या रात्री भरधाव वेगातील चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन गंभीर अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक श्रीदत्त पाटील सोनारीकर व इतर नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत....
error: Content is protected !!