अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून काँग्रेस नेत्यांविरोधात सिडकोत ‘जोडेमार’ आंदोलन
मातंग समाजाचा तीव्र संताप; नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेचा निषेध
नवीन नांदेड | अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध केल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला सिडको येथील डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मातंग समाज बांधवांनी गुरुवारी (२ जुलै) जोडेमार आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्रातील मातंग समाजाची अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयानंतर तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाली असून, महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर निर्णय व्हावा, अशी समाजाची अपेक्षा आहे.
यासाठी राज्य शासनाने निवृत्त न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने आपला अहवाल शासनाकडे स...
