Tag: अज्ञात सहा-सात जणांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया

रेल्वे फाटक कर्मचाऱ्यावर हल्ला; अज्ञात सहा-सात जणांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया

रेल्वे फाटक कर्मचाऱ्यावर हल्ला; अज्ञात सहा-सात जणांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया

क्राइम
बंद फाटक उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कर्मचाऱ्याने विरोध केल्याने काठी व दगडाने मारहाण; रेल्वे प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा नांदेड, अनिल मादसवार | लेव्हल क्रॉसिंग फाटक क्रमांक ५३ येथे कर्तव्य बजावत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यावर अज्ञात सहा-सात जणांनी हल्ला केल्याची गंभीर घटना मध्यरात्री घडली. बंद असलेल्या रेल्वे फाटकाचा बूम उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कर्मचाऱ्याने विरोध केल्यानंतर आरोपींनी काठी व रेल्वे रुळावरील दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात कर्मचाऱ्याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. दिनांक ९ व १० सप्टेंबरच्या मध्यरात्री सुमारे २.३५ वाजता, ट्रॅक मेंटेनर ओमप्रकाश गिरी हे रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत फाटक क्रमांक ५३ वर कर्तव्यावर होते. याचवेळी राज्यराणी एक्स्प्रेस (१७६११) रेल्वेगाडी जात असताना सहा-सात अज्ञात व्यक्तींनी बंद असलेल्या फाटकाचा बूम चालविण्याचा प्रयत्न केला. गिर...
error: Content is protected !!